Badrinath

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून ३,१३३ मी (१०,२७९ फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ महिने दर्शनासाठी खुले असते.